Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर आता उमेदरांकडून अर्ज भरले जात आहेत. अशाच आज २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत योग असल्याने उमेदवारांनी आजच्या दिवसाचा मुहूर्त साधत अर्ज भरण्याला प्राधान्य दिलं आहे. सर्व राजकीय पक्षांच्या काही उमेदारांकडून आज उमेदवारी अर्ज भरले जात आहेत.आदित्य ठाकरे आज वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचले होते. यावेळी ढोल- बँजोच्या वादनासह कोळी पेहरावातील महिलांनी नृत्य करत आदित्य ठाकरेंच्या शक्ती प्रदर्शनच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.