Zeeshan Siddique vs Uddhav Thackeray: वांद्रे पूर्व हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघावर सुरुवातीपासून शिवसेनेची पकड आहे. २०१९ च्या निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या हातून निसटला आणि काँग्रेसच्या ताब्यात गेला होता. शिवसेनेने केलेल्या एका चुकीमुळे त्यांना त्यांचा बालेकिल्ला गमवावा लागला. काँग्रेसचे झिशान सिद्दिकी येथील विद्यमान आमदार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांची म्हणजेच माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली होती. या दुःखातून सावरत झिशान सिद्दिकी हे निवडणुकीच्या कामाला लागले आहेत, मात्र मविआने त्यांचं तिकीट कापलं आहे. त्यामुळे झिशान सिद्दिकी आता महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने वांद्रे पूर्वमधून उमेदवार जाहीर केल्यानंतर झिशान सिद्दिकी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे.