काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी यशोमती ठाकूर यांना पाठिंबा देण्यासाठी हरियाणातील जुलाना मतदारसंघाच्या आमदार विनेश फोगट देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांना लाडकी बहीण योजनेसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.