Maharashtra Vidhansabha Elections 2024: निवडणूक आयोगाने वाढती महागाई लक्षात घेऊन उमेदवाराला ४० लाखांपर्यंत खर्च करण्याची मुभा दिली आहे. यापूर्वी ही मर्यादा २८ लाखांची होती. यामध्ये या वेळी वाढ करण्यात आली आहे. बैठका, सभा, रॅली, जाहिरात पत्रक, वाहनांचा खर्च आदींचा यामध्ये समावेश आहे. हा सर्व खर्च निवडणूक आयोगाच्या अधीन राहून करावा लागणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने खर्चाचे दर निश्चित केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून हा खर्च ग्राह्य धरला जातो. यासाठी उमेदवारांना राष्ट्रीयीकृत किंवा सहकारी बँकेत खाते उघडावे लागते. अर्ज दाखल करताना उमेदवाराला खर्चाच्या नोंदीसाठी रजिस्टर दिले जाते. त्यामध्ये उमेदवारास निवडणूक काळातील खर्च दैनंदिन खर्च नोंद करणे अनिवार्य आहे.