काँग्रेसने कसबा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर यांना संधी दिली आहे. गुरुवारी (२४ ऑक्टोबर) उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी प्रसार माध्यामांशी संवाद साधला. पुन्हा एकदा कसब्याचा आमदार होईन, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना संधी दिली होती.