विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रसेला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. गेला काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा रंगली होती. अखेर आज सकाळी त्यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. दरम्यान, झिशान यांच्या या पक्ष प्रवेशाला काँग्रेससह ठाकेर गटही कारणीभूत ठरल्याचं का बोललं जातंय. या विषयी सविस्तर जाणून घेऊ या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आपल्या निश्चित झालेल्या जागा जाहीर केल्या आहेत.