Aaditya Thackeray Nomination Form: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या महिन्याभरावर आली असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. २४ ऑक्टोबरला शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आदित्य ठाकरे, राजन विचारे, भाजपाचे मंगलप्रभात लोढा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नजीब मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जितेंद्र आव्हाड तर अपक्ष उमेदवार विजय नाहटा अशा काही नेत्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जासह जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेबाबतची माहिती समोर आली आहे. त्यात आदित्य ठाकरेंच्या मालमत्तेमध्ये गेल्या पाच वर्षांत जवळपास ६ कोटींची भर पडल्याचं स्पष्ट झालं आहे.