विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आयाराम आणि गयाराम यांच्या संख्येतही वाढ होत आहे. आज (२५ ऑक्टोबर) अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका तासात चार मोठे पक्षप्रवेश झाले आहेत. तसंच पक्ष प्रवेश होताच त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. शिवाय आपल्या दुसऱ्या यादीत अजित पवार गटाने महाविकास आघाडी विरोधात तगडे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत काय निर्णय होणार? याची चर्चा होती. त्यावरूनही आता पडदा उठला आहे. या विषयी सविस्तर जाणून घेऊ