Devendra Fadnavis vs Nana Patole: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शनासह नागपुरात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटलेल्या वादात काही उत्तरे दिली तसेच नाना पटोले यांच्या ‘शकुनी’ कमेंटला सुद्धा फडणवीसांनी चोख उत्तर दिलं. दरम्यान नाना पटोले यांनी काँग्रेस व भाजपातील घराणेशाहीवरून केलेली टीका काय होती हे ही पाहूया.