हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. विधान परिषदेवर हर्षवर्धन पाटील यांना घेण्याचा विचार होता, असा खुलासादेखील अजित पवारांनी यावेळी केला. दत्तात्रय मामा भरणे यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी अजित पवार आज इंदापूरात होते.