रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाणे हद्दीत खालापूर टोल नाका येथे निवडणूक भरारी पथक आणि खालापूर पोलीसांनी पिकअप वाहनाची तपासणी केली असता सदरच्या वाहनात चांदीच्या विविध वस्तू आढळून आल्याने तात्काळ सदरचे वाहन ताब्यात घेऊन खालापूर पोलीस आणि निवडणूक भरारी पथकाच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली असता सदरच्या वाहनात अंदाजे सात ते आठ कोटी रुपयांची चांदीच्या वस्तू या आढळून आल्या.या संदर्भात खालापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.