माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी २५ ऑक्टोबर रोजी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात एका मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात भाजपा नेते वसंतराव देशमुख यांनी आपल्या भाषणात संगमनेरचे आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्ये केली. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या अश्लाघ्य विधानावर आता जयश्री थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.