Sangamner News Update: भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या सभेत भाजपाचे नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्यावर अश्लाघ्य टीका केल्यानंतर संगमनेर तालुका आणि अहिल्यानगरमध्ये (जुने अहमदनगर) त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. देशमुखांचे विधान काल व्हायरल झाल्यानंतर थोरात यांच्या समर्थकांनी सुजय विखे पाटील यांच्या ताफ्यातील वाहनांवर हल्ला चढवत काही वाहनांची तोडफोड केली. तसेच वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर सुजय विखेंनीही त्यांच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान हे प्रकरण ज्यामुळे पेटलं ते वसंतरावांचं विधान काय होतं हे पाहूया.