माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात युवा संकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात वसंतराव देशमुख यांनी आपल्या भाषणात संगमनेरचे आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्ये केली. त्यांच्या या वक्तव्यावर आता अनेक राजकीय नेत्यांनी टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी देखील वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.