संगमनेरमध्ये सुजय विखे पाटील आणि जयश्री थोरात यांच्यात वाद विकोपाला पोहोचले आहेत. जयश्री थोरात यांच्याबद्दल वसंतराव देशमुख यांनी काढलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना अटक झालेली असताना आता सुजय विखे पाटील यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायावरही न्याय मागितला आहे. संगमनेरमध्ये झालेल्या सभेत सुजय विखेंनी सातत्याने आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप केला आहे. त्यावेळी त्यांना अश्रूही अनावर झाले होते.