राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे हे डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात यशस्वी झाले आहेत. अशी टीका बंडखोर नाना काटे यांनी कोल्हे यांच्यावर केली आहे. महायुतीमधून अजित पवार गटाचे नाना काटे हे बंडखोरी करत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी लोकसत्ताशी संवाद साधला. खासदार अमोल कोल्हे यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर सडकून टीका केली. महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला.