चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी बंडखोर ‘नाना काटे’ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ‘राहुल कलाटे’ यांच्यावर विधान केलं आहे. नाना काटे माघार घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे राहुल कलाटे यांच्यावर निशाणा साधत तुल्यबळ नसल्याचं शंकर जगताप यांनी म्हटलं आहे. शंकर जगताप यांच्याशी आमचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी संवाद साधला आहे.