कसबा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तत्पूर्वी त्याना ग्रामदैवत कसबा गणपतीची सपत्नीक आरती केली. त्यानंतर रविंद्र धंगेकर यांनी रॅली काढत, अर्ज दाखल केला. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत भाजपाला इशारा दिला आहे.