आज राज्यातील अनेक दिग्गज नेते आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बारामतीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.