मविआने बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना संधी देऊन अजित पवार यांच्याविरोधात त्यांच्याच सख्या पुतण्याला उभं केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा काका-पुतण्या लढत पाहायला मिळत आहे. युगेंद्र पवार यांनी आज बारामती तहसील कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर युगेंद्र पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आहे.