उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२८ ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.तसेच अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी देखील आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता बारामतीमध्ये पवार विरूद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. याबाबत अजित पवार यांनी कन्हेरी येथील जन सन्मान सभेत भाष्य केलं. सभेत बोलताना अजित पवार भावूक झाले.