बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. अजित पवार यांच्या विरुध्द शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याविषयी एका सभेत बोलताना अजित पवार भावुक झालेले दिसले. याबद्दल युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांना विचारलं असता, त्यांनी अजित पवार यांनी माघार घेऊन युगेंद्रला संधी द्यावी, असं म्हटलं आहे.