छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच (ठाकरे गटा) अधिकृत उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. उमेदवारी जाहीर होऊन आणि ए बी फॉर्म दिल्यानंतर किशनचंद यांनी ऐनवेळी माघार घेण्याचा निर्णय का घेतला यावरून आता अनेक चर्चा रंगल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास एक दिवस बाकी असताना किशनचंद यांनी हा निर्णय का घेतला? तर आता किशनचंद यांच्या जागी ठाकरे गटाकडून कोण उमेदवार रिंगणात उतरेल या विषयी व्हिडीओ मध्ये सविस्तर जाणून घेऊ.