Shrinivas Vanga Palghar: शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर पालघरमधील नेते वनगा नैराश्यात गेल्याचे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. काल सायंकाळी त्यांनी माध्यमांशी बोलत असताना श्रीनिवास वनगा यांनीही आपली नाराजी व्यक्त केली. तसेच उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून आपण चूक केली, असेही बोलून दाखवले.यावर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत खरपूस समाचार घेतला आहे.