शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) मालेगाव बाह्य मतदार संघातील उमेदवार अद्वय हिरे यांच्यावर सोमवारी दुपारी शहराजवळील सोयगाव भागात हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार ठाकरे गटाने केली आहे. याप्रकरणी आता खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत थेट मंत्री दादा भुसेंवर आरोप केला आहे.