विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आता राजकीय पक्षांमध्ये नाराजांची संख्याही वाढताना दिसत आहे. त्यातही महायुतीतील आमदारांनी व्यक्त केलेली उघड नाराजी याबाबत आता चर्चा रंगली आहे. श्रीनिवास वनगा यांच्यानंतर मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. आणि ही नाराजी व्यक्त करताना त्यांनी दोन वर्षांपूर्वी झालेल्या शिंदेंच्या बंडाचा देखील उल्लेख केला आहे.