“माझ्यावर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर आर.आर. पाटील यांनी खुली चौकशी करण्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली होती”, असा दावा अजित पवार यांनी एका सभेत भाषण करताना केला. त्यांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवारांनी आर.आर.पाटलांबद्दल केलेलं वक्तव्य हे दु:ख आणि वेदना देणारं होतं”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.