अयोध्यानगरीत बुधवारी (३० ऑक्टोबर) दिपोत्सवानिमित्त डोळ्याचं पारणं फेडणारं अद्भुत दृश्य पाहायला मिळालं. यावेळी तब्बल २५ लाख दिव्यांनी शरयू नदीचा तीर उजळून निघाला होता. त्याचबरोब लेझर शोच्या माध्यामातू रामलीलाची गोष्ट दाखवण्यात आली.
शरयू नदीच्या तीरावर राम की पाडी येथे २५ लाख दिवे लावण्यात आले आणि १ हजार १२१ भाविकांनी एकत्रित आरती केली असे दोन विश्वविक्रम करण्यात आले.