आमच्या साथेने भाजपाचा मुख्यमंत्री होईल, असं मोठं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या विधानाने आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. याबाबत आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात प्रत्येक पक्षाला आपली भूमिका घेण्याची मुभा आहे. मात्र हा दबाव ईडी, सीबीआय की आणखी कशाचा आहे? असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला.