वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना बुधवारी (३१ ऑक्टोबर) रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अँजिओग्राफी केली जाणार असून सध्या त्यांची तब्येत ठीक आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांचे सुपूत्र सुजात आंबेडकर यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.