पुढील मुख्यमंत्री भाजपाचा असून आम्ही महायुतीबरोबर जाण्याचा पर्याय निवडू, असं राज ठाकरे यांनी एका चॅनेलच्या कार्यक्रमामध्ये म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. राज ठाकरेंचा मनसे पक्षही आता महायुतीत सामिल होणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. अशातच आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.