महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दीपोत्सव साजरा केला जातो.परंतु,आता आचारसंहिता काळातही हा दीपोत्सव साजरा होत असल्याने शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना यासंदर्भात पत्र पाठवून कारवाई करण्याच आवाहन केले आहे. यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.