भायखळा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना (एकनाथ शिंदे) उमेदवार शायना एन. सी. यांच्याबाबत अपशब्द वापरला आहे. यावरून शायना एन. सी यांनीही त्यांना शाब्दिक चपराक लगावली आहे. अशातच आता अरविंद सावंत यांनी शायना एन. सी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.