वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सध्या त्यांना डाॅक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आता रुग्णालयातून जनतेला व्हिडीओच्या माध्यमातून महत्त्वाचा संदेश दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार, असं विधान त्यांनी केलं आहे.