मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकदा आपल्या भाषमातून शरद पवार यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला आहे. यासंदर्भात विचारलं असता शरद पवारांनी त्यावर खोचक टिप्पणी केली. “मला महाराष्ट्रात एक उदाहरण दाखवावं की मी जातीयवादी राजकारण केलं. ज्यांनी उभ्या आयुष्यात काही केलंच नाही, फक्त वक्तव्य केली, टीका-टिप्पणी केली त्यांच्या वक्तव्यावर आपण काय भाष्य करायचं? दुर्लक्ष करायचं”, असं शरद पवार म्हणाले.