विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार द्यायचे याचा निर्णय आधीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा सामाजातील अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यानुसार रविवारी (३ नोव्हेंबरला) उमेदवारांची घोषणा करणार असल्याचं मनोज
जरांगे पाटील आज अंतरवालीत झालेल्या बैठकीत सांगितलं. यावेळी निवडून येणाऱ्या उमेदवाराने लेखी बाँड आणि व्हिडीओ द्यावा, असं जरांगे म्हणाले आहेत.