मनोज जरांगे पाटील हे विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहेत. मात्र एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकेदेखील उमेदवार त्यांच्याकडे नाहीत, असं म्हणत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी त्यांना टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांचं नाव घेत त्यांनी जरांगेंना दम दिला असंही खोचकपणे हाके म्हणाले.