विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार देणार आणि आरक्षणविरोधी भूमिका घेणाऱ्या आमदारांना पाडणार, अशी गर्जना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यानुसार रविवारी (३ नोव्हेंबर) जरांगे उमेदवारही जाहीर करणार होते. मात्र आज त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जरांगेंना टोला लगावला आहे. बारामतीवरून आदेश आल्यानंतर त्यांनी पळ काढला, असंही हाके म्हणाले