शिवसेनेचे (शिंदे गट) माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सदा सरवणकर हे उमेदवारी अर्ज मागे घेणार का याबाबत अद्यापही संभ्रम काय आहे. आज सरवणकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल असं म्हटलं आहे. तसंच शिवसेनेकडून मनेसेला प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे. त्याविषयी देखील सरवणकर यांनी भूमिका स्पष्ट केली.