चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अखेर बंडखोर नाना काटे यांनी माघार घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. सकाळपासूनच नाना काटे हे निवडणूक लढण्यावर ठाम होते. परंतु, दुसरीकडे अजित पवारांचा निर्णय हा अंतिम असल्याच देखील नाना काटे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे नाना काटे ही निवडणूक लढणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष होतं.