Sada Sarvankar vs Amit Thackeray in Mahim Assembly Constituency : मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महायुतीतील मोठा पक्ष असलेल्या भाजपाने अमित ठाकरे यांना या मतदारसंघात पाठिंबा दिला आहे. शिवसेनेने (शिंदे) येथील विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना माहीममधून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, सरवणकरांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपा व मनसेने दबाव निर्माण केला होता. मात्र, सरवणकरांनी त्यांचा अर्ज मागे घेतलेला नाही. आज (४ नोव्हेंबर) दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, सरवणकरांनी आपला अर्ज मागे घेतलेला नाही.