Raj Thackeray Speech In Kalyan: विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा दिवस संपला असून आता कोण कोणाविरोधात लढणार आहे हे चित्र स्पष्ट झालंय. तसंच, दिवाळीची धामधामूही आता आटोपली असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. २०१९ मध्ये निवडून आलेल्या आमदाराच्या मतदारसंघातून राज ठाकरेंनी प्रचाराचा नारळ फोडला आहे.