Sharad Pawar Retirement: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत उलटल्यानंतर आता राज्यभरातल्या लढतींचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. शरद पवारांच्या राजकीय निवृत्तीची चर्चा होऊ लागली आहे. खुद्द त्यांनीच बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या प्रचारसभेमध्ये केलेल्या भाषणात तसेच संकेत दिले आहेत. मात्र, राजकारणातून निवृत्त झाल्यानंतरही सामाजिक कार्य करत राहणार असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.