वरळी विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेनेचे आमदार (ठाकरे गट) आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि शिवसेनेकडून (शिंदे गट) मिलिंद देवरा हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंना यंदा वरळीतील निवडणूक आव्हानात्मक ठरणार का? गेल्या पाच वर्षांतील कामाबाबत नारगरिकांची काय मतं आहेत? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.