चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुरुवातीला बंडखोरांना शमवण्याचं मोठं आवाहन जगताप यांच्यासमोर होतं. आता नाना काटेंनी घेतलेल्या माघारीनंतर जगताप यांच्या समर्थनार्थ स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज चिंचवडमध्ये जाहीर सभा घेत आहेत.