Devendra Fadnavis Targets Sharad Pawar & Supriya Sule: शरद पवार हे फेक नरेटिव्ह फॅक्टरीचे मालक आहेत, त्यांच्याकडून तरी ही अपेक्षा नाही असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल चिंचवड येथील सभेत केलं आहे. शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत फडणवीस म्हणाले की, वारंवार ते सांगतायेत की अनेक उद्योग गुजरातला पळवले जातायेत. नीती आयोगाचा आणि आरबीआयचा रिपोर्ट सांगतोय की देशात सर्वांधिक म्हणजे 52 टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात आलेली आहे. मविआ सरकारच्या काळात महाराष्ट्र पिछाडीवर होता, आम्ही महायुतीच्या सत्तेत आलो आणि आम्ही गुजरातला मागे सोडलं. मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे गुजरातचे मुखंड असल्यासारखं वागतायेत. उलट गुजरातचे हे प्रचारक झालेत. महाराष्ट्र प्रगती पथावर असताना ही ते आपले गुणगान गात नाहीत.