विधानसभा निवडणुकीच्यानिमित्ताने प्रचार सभांचा धुरळा उडत आहेत. सभांमध्ये टीका, आरोप प्रत्यारोपही रंगत आहेत. अशाच जतमध्ये झालेल्या एका सभेत रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. याबद्दल आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य करत महायुतीच्या नेत्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. नेमकं ते काय म्हणाले पाहुयात.