एकीकडे लाडक्या बहिणींना आता १५०० ऐवजी २१०० रुपये मिळणार, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील मुद्दा ठळक करताना दिलं आहे. तर दुसरीकडे महिलांना दर महिन्याला ३००० रुपये देणार असं आश्वासन महाविकास आघाडीने निवडणुकीच्या तोंडावर दिलं आहे. महाविकास आघाडीने पंचसूत्री सादर करत याबाबत आश्वासन दिलं आहे. त्यामुळे मविआ आणि महायुतीमध्ये गॅरंटीवरून रंगलेली ही चढाओढ मतदारांना किती आकर्षित करेल? मतांवर त्याचा परिणाम होणार का? याबद्दल जाणून घेऊ या.