राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एका पुस्तकात केलेल्या दाव्यावरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहेत. ईडीपासून सुटका व्हावी यासाठी राष्ट्रवादीतील नेते अजित पवारांच्या नेतृत्त्वात भाजपाबरोबर महायुतीत सामील झाल्याचा दावा भुजबळ यांनी केला आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे.