राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एका पुस्तकात केलेल्या दाव्यावरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाजपा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल चढवला. ईडीपासून सुटका व्हावी यासाठी राष्ट्रवादीतील नेते अजित पवारांच्या नेतृत्त्वात भाजपाबरोबर महायुतीत सामील झाल्याचा दावा भुजबळ यांनी केला आहे.